बँकांचे तंत्रोव्यवस्थापक


 

बँकांचे तंत्रोव्यवस्थापक

भारतीय बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राचा अतिशय वेगाने वाढ होत असल्याने या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रारंभ झाला आहे.त्यामुळे तांत्रिक कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

ध्या भारतातील आणि परदेशातील बँकिंग क्षेत्र हे अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्याद्वारे बँक व्यवहारामध्ये गतिमानता, पारदर्शकता आणि अचुकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा आणि सेवा यांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढीसाठी या तंत्रज्ञानाचा वापरावर भर दिला जात आहे.खर्चात घट करुन अधिकाधिक नफा कसा मिळवता येईल यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. बँकाच्या विस्तार - विकास आणि वृध्दी यामध्ये तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज वाढली आहे. नव्या बँका, वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांची सातत्याने वाढ होत असल्याने या तज्ज्ञ मनुष्यबळाची गरजही वाढली आहे.

ही बाब लक्षात घेऊन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग टेक्नॉलॉजी. हा अभ्यासक्रम २०१६ साली, इंस्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी, या संस्थेने सुरु केला आहे. या संस्थेची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. कार्यालयीन कामाकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, त्याचा विविध घटकांमध्ये अंतर्भाव करणे आणि या सर्वांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे तंत्र आणि कौशल्य या अभ्यासक्रमात शिकवले जाते. या अभ्यासक्रमात सध्या वापरात असलेले तंत्रज्ञान आणि उदयास येउु घातलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. भारतीय बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र, तंत्रज्ञानाने कार्यक्षम करण्यासाठी हा अभ्यासक्रम केलेले उमेदवार अत्यंत उपयुक्त ठरु शकतात.

अर्हता- या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुण प्राप्त केलेला अभियांत्रिकी पदवीधर किंवा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार प्रवेश घेऊ शकतो. प्रवेशासाठी कॅट- कॉमन एंट्रन्स टेस्ट, मॅट-मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, जीमॅट- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, सीमॅट- कॉमन मॅनेजमेट ॲडमिशन टेस्ट, झॅट- झेवियर ॲप्टिट्यूड टेस्ट या परीक्षांमधील गुण ग्राह्य धरले जातात. या अभ्यासक्रमाला ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना कोटक महिंद्र बँक, द साऊथ इंडियन बँक लिमिटेड, फेडेरल बँक, कॅथोलिक सिरियन बँक यासारख्या संस्थांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे.

संपर्क- कासल हिल, रोड नंबर एक, मसाब टँक, हैदराबाद- ५०००५७, दूरध्वनी- ०४०-२३२९४०००, फॅक्स- २३५३५१५७,संकेतस्थळ- www.idrbt.ac.in,

,ईमेल-  pgdbtadmissions@idrbt.ac.in 

००००

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन फायनांशिएल टेक्नॉलॉजी- हा अभ्यासक्रम, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सिक्युरिटज मार्केट्स, या संस्थेने सुरु केला आहे. ही संस्था सिक्युरिटिज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, या संस्थेंतर्गत कार्यरत असणारी शिक्षण संस्था आहे. या अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केली आहे. कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही अभियांत्रिकी विषयातील ६० टक्के गुणांसह पदवी किंवा ६० टक्के गुणांसह गणित किंवा सांख्यिकी किंवा भौतिकशास्त्र किंवा संगणक शास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी. कालावधी- दोन वर्षे.  या अभ्यासक्रमाला निवड झालेल्या पहिल्या १५ विद्यार्थ्यांना दरमहा ३० हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. या अभ्यासक्रमाचा निवडीसाठी कॅट, मॅट, जीमॅट, झॅट, सीमॅट  किंवा एमएच-सीइटी-एमबीए/एमएमएस या परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य धरले जातात. संपर्क- www.nism.ac.in

०००

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनांशिअल मॅनेजमेंट. संस्था- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फायनांशिअल मॅनेजमेंट, फरिदाबाद- कालावधी- दोन वर्षे. ही संस्था भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. निवडीसाठी कॅट, मॅट, जीमॅट, झॅट, सीमॅट या परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य धरले जातात. संपर्क- www.nifm.ac.in

000

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ॲण्ड लाइफ इंशुरन्स – हा अभ्यासक्रम  इंस्टिट्यूट ऑफ इंशुरन्स ॲण्ड रिस्क मॅनेजमेंट - आयआयआएम हैदराबाद मार्फत चालवला जातो. -  या संस्थेची स्थापना इंशुरंन्स रेग्युलेटरी ॲण्ड डेव्हलपमेंट ॲथोरिटी ऑफ इंडिया -आयआरडीएआय आणि तेलंगणा सरकारने केली आहे. या संस्थेमार्फत ,पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲक्युरिअल सायन्स ,हा अभ्यासक्रमही चालवला जातो.दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी एक वर्षं.  अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- www.iirmworld.org.in

000

एमबीए इन बँकिंग ॲण्ड फायनांशिएल इंजिनीअरिंग- संस्था - चंदिगढ युनिव्हर्सिटी. हा अभ्यासक्रम आयसीआयसीआय डायरेक्ट लर्निंग या संस्थेच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. संपर्क -www.cuchd.in

०००

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी