स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम


 स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम

वाणिज्य शाखेमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी पुढील स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम करुन स्वत:चा करीअर आलेख सतत उंचावत ठेऊ शकतात.

    चार्टर्ड अकाउंटंट- हे तज्ज्ञ कंपनीचे लेखापरीक्षण, करनिर्धारण आदी बाबींवर लक्ष ठेवतात. कंपनीच्या वित्तीय बाबींची काळजी आणि संनियंत्रण करण्याचे कार्य त्यांना करावे लागते. आर्थिक उलाढाली सातत्याने वाढत असल्याने या तज्ज्ञांची गरजही वाढत चालली आहे. विदेशातील कंपन्याही त्यांच्या सेवा घेत असतात. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही संस्था या विषयाशी निगडित अभ्यासक्रम चालवित असते.

या अभ्यासक्रमाला दोन पध्दतीने प्रवेश मिळू शकतो- () फाउंडेशन कोर्स- 12 वीमध्ये असणऱ्या कोणत्याही ज्ञानशाखेतील उमेदवार या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. हा फाउंडेशन कोर्स उत्तीर्ण झाल्यावर इंटरमिजिएट कोर्सला मध्ये प्रवेश घ्यावा लागतो. त्यानंतर विशिष्ट स्वरुपाचे प्रशिक्षण (आर्टिकल्ड ट्रेनिंग) पूर्ण करुन फायनल कोर्समध्ये प्रवेश घ्यावा लागतो.

() डायरेक्ट एन्ट्री- ५५ टक्के गुणांसह वाणिज्य शाखेतीलपदवी किंवा पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थी किंवा ६० टक्के गुणांसह  इतर शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थी थेट इंटरमिजिएट अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवू शकतात.

संपर्क- www.icai.org

००००

बॅचलर ऑफ कॉमर्स इन कॅपिटल मार्केट्स-

    हा अभ्यासक्रम बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे. अर्हता- १२वी उत्तीर्ण. अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना बँक, वित्तीय कंपन्या, शेअर ब्रोकिंग, कमोडिटिज, पेंशन फंड यामध्ये करीअर संधी मिळू शकते. सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, फॉरवर्ड मार्केट कमिशन, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज या संस्थांमध्येही नोकरी मिळू शकते.

संपर्क- बीएसई, इंस्टिट्यूट लिमिटेड, १८ आणि १९ मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई-४००००१, दूरध्वनी- ०२२-२२७२८८७३, ईमेल- admissions@bseindia@.com, संकेतस्थळ-mumbaiuniversity.bsebti.com आणि pgpbf.bsebti.com

००००

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सिक्युरिटिज मार्केट्स-

()पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन सिक्युरिटज मार्केट्स-अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी, कालावधी- दोन वर्षे. प्रवेशासाठी कॅट, जीमॅट, एमएचसीईटी- एमबीए/ एमएमएस परीक्षेतील गुण.

संपर्क-- प्लॉट नंबर- एल एस १ आणि एल एस २, पाताळगंगा इंडस्ट्रिअल एरिआ, मोहोपाडा, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र- ४१०२२२, संकेतस्थळ- www. nism.ac.in/pgdm, ईमेल- pgdm@nism.ac.in

 

()पोस्ट ग्रॅज्यूएट प्रोग्रॅम इन सिक्युरिटज मार्केट्स- अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी, कालावधी- एक वर्षे. संपर्क- संकेतस्थळ- www. nism.ac.in/pgpsm, ईमेल- pgpsm@nism.ac.in

 ०००

सिम्बॉयसीस सेंटर फॉर डिस्टंस लर्निंग-

या संस्थेचे पुढील अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणपध्दतीने करता येतात.()पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन इंशुरंस मॅनेजमेंट, () पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन बिझिनेस ॲण्ड कॉर्पोरेट लॉज, ()

पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट अकाउंटिंग.

संपर्क- सिम्बॉयसीस भवन, १०६५, बी. गोखले क्रॉसरोड, मॉडेल कॉलनी,पुणे- ४११०१६, संकेतस्थळ- www. scdl.net,

ईमेल-newadmissions@scdl.net, दूरध्वनी - ०२२-६६२११०००

०००

पोदार कॉलेज मुंबई

या संस्थेत पुढील अभ्यसक्रम करता येतात. ()डिप्लोमा इन बँकिंग ॲण्ड फायनांस, ()सर्टिफिकेट इन स्टॉक मार्केट. संपर्क- संकेतस्थळ www.rpodar.ac.in

०००

मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स-

संस्थेचे अभ्यासक्रम- सर्टिफिकेट इन ()टॅक्स लॉ, ()फायनांस ॲण्ड बँकिंग, ()लॉजिस्टिक ॲण्ड सप्लाय चैन. संकेतस्थळ- www.mccmulund.ac.in

००

गॅलगोटिॲस युनिव्हर्सिटी-

अभ्यासक्रम- एमबीए इन बँकिंग ॲण्ड वेल्थ मॅनेजमेंट.

संपर्क- प्लॉट नंबर २,सेक्टर, १७-ए, यमुना एक्सप्रेस वे, ग्रेटर नॉयडा, गौतम बुध्द नगर, उत्तरपद्रेशसंकेतस्थळ-www.galgotiasuniversity.edu.in, ईमेल- admissions@ galgotiasuniversity.edu.in, दूरध्वनी- ०१२०-४३७००००

०००

इंटिग्रेटेड कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम

सेंटर फॉर कार्पोरेट गर्व्हनन्स, रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग  आणि द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी या दोन संस्थांनी  एकत्र येऊन इंटिग्रेटेड कंपनी सेक्रेटरी कोर्स, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- तीन वर्षे. दोन वर्षाच्या सैध्दांतिक(थिअरी) अभ्यासानंतर एक वर्षाचे या विषयाशी निगडित प्रशिक्षण दिले जाते.. या अभ्यासक्रमास 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

अर्हता- कोणत्याही शाखेतील 50 टक्के गुणांसह पदवी किंवा कंपनी सेक्रटरी अभ्यासक्रमातील फौंडेशन कोर्स उत्तीर्ण. अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी दोन तास कालावधीची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. यामध्ये रिझनिंग, इंग्रजी आणि न्युमरिकल ॲबिलिटी या विषयांवर प्रश्न विचारले जातात. अंतिम निवड समूहचर्चा आणि मुलाखतीनंतर केली जाते. CAT/XAT/NMAT/SNAP/MH-CET(एमएमएस/एमबीए)GMAT/ATMA या सारख्या परीक्षांमध्ये सुयोग्य गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून सूट मिळू शकते. मात्र तशी माहिती अर्जासोबत नोंदवावी लागते. या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर मुलाखती व समूहचर्चेसाठी बोलावले जाते

   कार्पोरेट लॉ, प्रशासन आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील उच्च श्रेणीच्या कौशल्यप्राप्त मनुष्यळाच्या निर्मितीसाठी कंपनी सेक्रेटरी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. नियामक प्राधिकरण, संचालक मंडळ, शेअरधारक आणि कंपनीचे इतर भागधारक यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून कंपनी सेक्रेटरीला कार्य करावं लागतं. मंडळाचे कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकार, विविध कायदे,नियम याविषयी माहिती देण्याचं काम कंपनी सेक्रेटरीस करावं  लागतं. याशिवाय कंपनीला कर, व्यवसाय आणि आर्थिक बाबींवर विविध कायदेशीर सल्ला देण्याचं कामही त्यास करावं लागतं.

 

पत्ता- प्लॉट नंबर 101, सेक्टर 15, इन्स्टिट्यूशनल एरिआ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- 400614, दूरध्वनी- 022- 41021501 फॅक्स-27574384 ईमेल- ccgrt@icsi.edu.in संकेतस्थळ- www. icsi.edu.in/ccgrt

०००

इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाशिवाय पुढीलपध्दतीनेही कंपनी सेक्रेटरीचा अभ्यासक्रम करता येतो-

    (1) 12 वीनंतर तीन टप्पे - फौंडेशन अभ्यासक्रम विज्ञान, कला, वाणीज्य (फाइन आर्ट सोडून) या विषयातील 12 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतो. या अभ्यासक्रमाला वर्षातून दोनदा प्रवेश घेता येतो. कालावधी- आठ महिने (2) एझ्क्यिुटिव्ह अभ्यासक्रम-  फाइन आर्ट पदवीधर सोडून कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकते. कालावधी - ९ महिने (3) प्रोफेशनल प्रोग्रॅम- हा अभ्यासक्रम एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना करता येतो.

पत्ता- (१) डायरेक्टोरट ऑफ अकॅडेमिक्स ॲण्ड प्रोफेशनल डेव्हलपमेंट, द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज, आयसीएसआय हाऊस, 22 इन्स्टिट्यूशनल एरिया, लोधी रोड, न्यू दिल्ली- 110003, ईमेल-info@ icsi.edu.in , दूरध्वनी- 011-24644431, संकेतस्थळ- http://www.icsi.edu/ () १३,५६ आणि ५७ जॉली मेकर चेम्बर्स नंबर २, पहिला आणि पाचवा माळा, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१, दूरध्वनी- ०२२- २२०४७५८० आणि ६१३०७९००, ईमेल- wiro@icsi.edu

०००

 

इंटरनॅशल वर्ल्ड ट्रेड इन्स्टिट्यूट

   यासंस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत- (1) पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड/ कालावधी सहा महिने/ अर्हता- पदवी (2) डिप्लोमा इन सप्लाय चैन मॅनेजमेंट, (3) डिप्लोमा इन  एक्सपोर्ट-इम्पोर्ट मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. अर्हता-कोणत्याही विषयातील 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हे अभ्यासक्रम करता येतात. कालावधी- प्रत्येकी 3 महिने.

    संपर्क - सेंटर वन बिल्डिंग, 31 वा माळा, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड मुंबई- 400005, दूरध्वनी- 022-66387391, संकेतस्थळ - www.wtcmumbai.org , ईमेल- wti@wtcmumbai.org

००

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी