कौशल्यातून रोजगाराकडे
कौशल्यातून रोजगाराकडे
विविध प्रकारच्या कौशल्यप्राप्त करणाऱ्या व्यक्तिंना रोजगार आणि स्वयंरोजगार करता येणं सोपं जातं. सरावानं कौशल्यात वाढ होते. विशिष्ट प्रकारची तज्ज्ञता प्राप्त होते. त्यातून प्रगतीच्या संधीही वाढत जातात. याबाबी लक्षात घेऊन मुंबईस्थित इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी ऍ़ण्ड ऍ़प्लाइड न्युट्रिशन या संस्थेनं हॉटेल आणि खानपान व्यवसायाशी निगडित अल्पकालावधीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. ही संस्था भारत सरकाराच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन
या अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षाचा आहे. कोणत्याही शाखेतील
१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. १२ वीमध्ये मिळालेल्या
गुणांच्या आधारावर या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. जुलै महिन्यात अभ्यासक्रमास
प्रारंभ होतो.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात कुकरी म्हणजेच पाककला, पोषण आणि आरोग्य, पाककलेसाठी
आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि त्यांच्या किमती, अन्नधान्य ठेवण्याचे कोठार/ खोली, संगणकीय
प्रशिक्षण यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर छोटी हॉटेल्स,उपहार गृहे, गेस्ट हाऊसेस येथे रोजगार आणि नोकरीच्या संधी मिळू शकतात. लहान प्रमाणात स्वत:चा व्यवसाय सुरु करुन भविष्यात मोठी झेप सुध्दा घेता येऊ शकते.
संपर्क - इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी ऍ़ण्ड ऍ़प्लाइड न्युट्रिशन, व्ही.एस.मार्ग, दादर(पश्चिम),मुंबई-400028, संकेतस्थळ -www.ihmctan.edu ईमेल-info@ihmctan.edu, दूरध्वनी-022-24457241
0000
पटकथेची कला
चित्रपटाच्या वा टीव्ही मालिकांच्या यशामध्ये पटकथा लेखकाचा महत्वाचा सहभाग असतो. कथा उत्तम असूनही पटकथा ढिसाळ असेल तर चित्रटपटाच्या यशावर परिणाम होतो. त्यामुळे पटकथेच्या बांधणीसाठी यशस्वी चित्रपट निर्माते खूप मेहनत घेतात.
पटकथालेखन ही कला आहेच. पण त्याचं एक तंत्रही आहे. हे तंत्र अवगत केल्यावर उत्तम पटकथेची रचना होईलच असं ठामरीत्या सांगता येत नसलं तरी या तंत्रावर सरावामुळे हुकूमत प्राप्त होऊ शकतं.
डिप्लोमा इन स्क्रिनरायटिंग
पटकथालेखनाचं करिअर करु इच्छिणाऱ्या व्यक्तिंसाठी व्हिसलिंगवूड इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन ऍ़ण्ड मीडिया आर्ट्स या संस्थेनं सुरु केलेला हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. यामध्ये पटकथालेखनाची मूलभूत बाबी,लघु चित्रपटासाठीची पटकथा, टीव्हीसाठी लेखन, पटकथेचे प्रगत सिध्दांत, आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
या संस्थेने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेच्या सहकार्याने, बीए इन स्क्रिनप्ले रायटिंग हा
अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी तीन वर्षे. कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण विद्यार्थाला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
संपर्क- फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, गोरेगाव (पूर्व), मुंबई-400065, दूरध्वनी-022- 30916141, संकेतस्थळ -www.whistlingwoods.net. ईमेल- admissions@ whistlingwoods.net
बॅचलर इन
स्क्रीन रायटिंग
हा अभ्यासक्रम गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ऍ़ण्ड डेव्हलपमेंट या संस्थेनं सुरु केला आहे.अर्हता- कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाचा कालावधी- ३ वर्षे
काय शिकाल?
इंग्रजीतून संवाद संप्रेषण, कला आणि अभिकल्प-डिझाइन, विचार आणि अभिकल्प प्रक्रिया, छायाचित्र ,चित्रपटनिर्मितीची तोंडओळख,मानवी स्वभाव आणि व्यक्तिरेखांचा विकास, कथाकथन, ग्रॅफिक्स, पाच मिनिटाचा चित्रपट,,पटकथेची कॉपी तयार करणे, बँडिंग करणे, काव्य, साहित्य आणि महाकाव्यांचा अभ्यास, जाहिरातींसाठी आणि सार्वजनिक उपयुक्तता असलेल्या चित्रपट/जाहिरातीसाठी लेखन,,भाषा आणि संवाद, दूरचित्रवाहिनींसाठी लेखन, लघु चित्रपटासाठी लेखन, तज्ज्ञांच्या कलाकृतींचा अभ्यास, लघुपट आणि पूर्ण लांबिच्या चित्रटपटांवर आधारित संशोधन कार्य,कथनाची शैली, साहित्यकृतीवर आधारित पटकथा, निर्मिती अभिकल्प-प्रॉडक्शन डिझाइन, ॲनिमेशन पटासाठी लेखन ,,व्यक्तिरेखांचा विकास, संघर्ष आणि धक्कातंत्रे, कॉपी राइट आणि व्यावसायिक करार या घटकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना एका पूर्ण लांबिच्या चित्रपटाची पटकथा लिहिण्याचा प्रकल्प करावा लागतो.
संपर्क- मुंबई विद्यापीठ विद्यानगरी सांताक्रुझ पूर्व कॅम्पस ,मुंबई- 400098, संकेतस्थळ-www.giced.edu.in
ईमेल- garware@giced.mu.ac.in दूरध्वनी- 022-26530258 फॅक्स-26530263
0000

Comments
Post a Comment