स्पोर्ट्स ॲण्ड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट

 

स्पोर्ट्स ॲण्ड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट

के.सी.कॉलेज मुंबई येथे बॅचलर ऑफ व्होकशन इन स्पोर्ट्स ॲण्ड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचाआहे. तो कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला  करता येतो. या अभ्यासक्रमात पुढील बाबींचा समावेशआहे-(१) मूलभूत संवादसंप्रेषण/कम्युनिकेशन, (२) पोषण, (३) व्यवस्थापनाची मूलभूत तत्वे, (४) मनोरंजन व्यवसायाची ओळख, (५) क्रीडा व्यवस्थापन, (६) क्रीडा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ व्यवस्थापन, (७) व्यवसाय व्यवस्थापनात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग,(८) एकात्मिक विपणन संवाद संप्रेषण ,(९) मनोरंजन विपणन/मार्केटिंग, (१०) आशय व्यवस्थापन, (११) जाहिरात ॲण्ड ब्रँड व्यवस्थापन, (१२) क्रीडा इव्हेंट व्यवस्थापन, (१३) क्रीडा जनसंपर्क, (१४) डिजिटल मार्केटिंग, (१५) माध्यम नियोजन, (१६) पुरवठा साखळी व्यवस्थापन, (१८) ग्रॅफिक डिझाइन आणि ॲनिमेशन, (१९) व्यवसाय नियोजन, (२०) सांख्यिकी व्यवस्थापन, (२१) क्रीडा विपणन, (२२) माध्यम निर्मिती-टीव्ही, रेडियो, चित्रपट, (२३) प्रचार व्यवस्थापन, (२४) क्रीडा सेलिब्रिटी  व्यवस्थापन, (२५) व्यवसाय/ बाजार/ मार्केट संशोधन, (२६) क्रीडा मानसशास्त्र, (२७) चित्रपटांचे प्रवाह आणि तंत्रज्ञान, (२८) टीव्ही निर्मिती-बातम्या आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम, (२९) क्रीडा प्रायोजकत्व, (३०) कार्यान्वयन व्यवस्थापन, (३१) समस्या व्यवस्थापन (३२) छायाचित्रण आणि व्हीडिओ प्रॉडक्शन, (३३) रेडिओ निर्मिती, (३४) समाज माध्यमे आणि ब्रँडिंग, (३५) ओव्हर द टॉप (ओटीटी) आणि नव्या युगातील इतर डिजिटल माध्यमे, (३६) मनोरंजन जगातील प्रतिभा व्यवस्थापन, (३७) इलेक्ट्रॉनिक क्रीडा, (३८) डिजिटल जाहिराती, (३९) संघर्ष आणि समझौता.

क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्राचा वाढलेला अवकाश लक्षात घेता हा अभ्यासक्रम दोन्ही क्षेत्रात उत्तमोत्तम करिअर संधी उपलब्ध करुन देऊ शकतो. संपर्क- https://kccollege.edu.in

 


Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी