टीव्हीचे खरे “सूत्रधार”!



 टीव्हीचे खरे “सूत्रधार”!

आपल्या देशात टेलिव्हीजन माध्यमाचा विस्तार  प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला आहे. शेकडो  वाहिन्या   आणी  त्यावरील मोजता मोजता थकवून टाकणारे बहुरंगी -बहुढंगी कार्यक्रम. या कार्यक्रमांचा रतिब २४ तास सुरु. त्यामुळे या माध्यमाची कंटेट म्हणजेज आशयाची भूक ही कुंभकर्णी  किंवा त्यापेक्षाही कित्येकपट. सगळया  वाहिन्यांना  कार्यक्रम ‍निर्मितीमध्ये जरासुध्दा खंड पाडता येत नाही. इतक्या असंख्य कार्यक्रमाची ‍निर्मिती करायची म्हणजे, तसेच  उत्तम प्रशिक्षीत मनुष्यबळ हवे.  

वाहिन्यांचे सगळे कार्यक्रम हे सर्जनशील  असल्याने त्यासाठी लागणारे मनुष्यबळसुध्दा कौशल्ययुक्त असणे गरजेचे. ही गरज भागवण्याचे काम,  ‍ फिल्म ॲण्ड  टेलिव्हीजन ‍ इंस्टीट्यूट ऑफ इंडिया ही संस्था करत असते. ही आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील या क्षेत्राचे उत्कृष्ट  शिक्षण व प्रशिक्षण देणारी संस्था. या संस्थेतून गेल्या गनेक वर्षात एकापेक्षा श्रेष्ठ मनुष्यबळ बाहेर पडले आहे. या सर्वांनी भारतीय चित्रपट व  टीव्ही माध्यमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.  या संस्थेचे मनुष्यबळ हे जागतिक तोडीचे समजले जाते. त्यामुळेच आज भारतीय चित्रपट व टीव्ही, दोन्ही माध्यमे जागतिक पातळीवर दबदबा निर्माण करण्यास यशस्वी झाली आहेत. या संस्थेने टीव्ही, चित्रपट, ॲनिमेशन, व्हीएफक्स या  क्षेत्रासाठी कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत .हे सर्व अभ्यासक्रम या क्षेत्रातील नामवंत, यशस्वी व्यक्ती  शिकवतात. सैध्दांतिक ज्ञानासोबत प्रात्यक्षीकांवर  भर दिला जातो. संस्थेकडे अत्याधुनिक सामग्रीने सुसज्ज असा स्टुडीओ आहे. त्यामुळे या संस्थेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी  व विद्यार्थीनी निवडलेल्या क्षेत्रात यशाला गवसणी घालतात. या संस्थेचा दर्जा  व गुणवत्ता कायम राहावी यासाठी मोजक्याच उमेदवारांना प्रवेश दिला जातो. या संस्थेत प्रवेश मिळावा म्हूणन हजारो  उमेदवार  इच्छूक असतात. त्यातून   सुयोग्य उमेदवारांच्या ‍निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची काठीण्य पातळी उच्च दर्जाची असते.

टेलिव्हीजन  माध्यमासाठी अभ्यासक्रम

या संस्थेमार्फत  टेलिव्हीजन  या माध्यमासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ नि‍र्मितीचे  पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. (१) पोस्ट ग्रॅज्युएट  सर्टिफिकेट कोर्स इन टेलिव्हीजन वुईथ स्पेशलायझेशन इन  टिव्ही डायरेक्शन, (२) पोस्ट ग्रॅज्युएट  सर्टिफिकेट कोर्स इन टेलिव्हीजन वुईथ स्पेशलायझेशन इन इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्रॅफी, (३) पोस्ट ग्रॅज्युएट  सर्टिफिकेट कोर्स इन टेलिव्हीजन वुईथ स्पेशलायझेशन इन  व्हीडीओ एडिटिंग, (४) पोस्ट ग्रॅज्युएट  सर्टिफिकेट कोर्स इन टेलिव्हीजन वुईथ स्पेशलायझेशन इन साऊंड रेकॉर्डिंग ॲण्ड टेलिव्हीजन इंजिनीअरिंग. या चारही अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येकी एक वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमांना अखील भारतीय तंत्र शीक्षण मंडळाची मान्यता  ‍ मिळाली आहे. या अभ्यासक्रमांना कोणत्याही ‍विद्याशाखेतील पदवीधर प्रवेश घेऊ शकतो. यंदा पदवीच्या  अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमांच्या चाळणी परीक्षेला बसू शकतात. मात्र त्यांना  १० मार्च २०२४ पर्यंत  अंतिम  परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.  या अभ्यासक्रमातील १५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्ग, २७ टक्के जागा  नॉन क्रिमी लेअर इतर मागास संवर्ग, १० टक्के जागा  आर्थीक दृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस)संवर्गासाठी राखीव आहेत. काही अटीशर्तींसह ५ टक्के जागा  दिव्यांगांसाठी राखीव आहेत.

असी असेल परीक्षा

चाळणी परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई, पुणे, कोलकता, नवी दिल्ली, चेन्नई, ऐजवाल  व जम्मू या सात शहरांमध्ये  घेतली जाईल. या परीक्षेचे दोन पेपर्स असतील. या पेपरचा एकूण कालावधी तीन तासांचा असेल. यामध्ये १०० गुणाचे प्रश्न विचारले जातील. (१) पेपर एकमध्ये, भाग एक हा मल्टीपल ‍ ‍चॉईस  क्वच्छेन ( सिंगल ॲन्सर टाईप– बहुपर्यायी प्रश्न-एकल उत्तर पध्दत) या पध्दतीचा असेल. (२) भाग दोन, हा मल्टीपल ‍ ‍सिलेक्ट  क्वच्छेन ( बहुपर्यायी निवड पघ्दत)या प्रकारातील असेल. दोन्ही भागांमध्ये प्रत्येकी २० गुणांचे प्रश्न विचारले जातील.

पेपर दोन हा विस्तृत उत्तर पध्दतीचा असेल. या पेपरचे गुण असतील ६०.

लेखी परीक्षेतील गुणांवर आधारीत प्रत्येक संवर्गनिहाय  गुणवत्ता यादी  तयार केली जाईल. या  यादितील सर्वोच्च गुण प्राप्त निवडक  उमेदवारांना कलचाचणी   व  मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ‍ अंतिम निवड यादी ही लेखी परीक्षेतील गुण, कलचाचणी  व  मुलाखत यावर तयार केली जाईल. यानंतर वैद्यकीय चाचणी होईल. या चाचणीत  अनुत्तीर्ण झाल्यास प्रवेश रद्द केला जाऊ शकतो.

चित्रपट माध्यमांसाठी अभ्यासक्रम (१) पोस्ट ग्रॅज्युएट    डिप्लोमा कोर्स इन  डायरेक्शन ॲण्ड  स्क्रीनप्ले रायटिंग (अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. या अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा सत्रात विभागलेली तीन वर्षे), (२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन सिनेमॅटोग्रॅफी (अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. या अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा सत्रात विभागलेली तीन वर्षे), (३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन एडिटिंग, (अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. या अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा सत्रात विभागलेली तीन वर्षे), (४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन साऊंड रिकॉर्डिंग ॲण्ड साऊंड   डिझाइन (अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. या अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा सत्रात विभागलेली तीन वर्षे), (५) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन आर्ट डायरेक्शन ॲण्ड प्रॉडक्ट   डिझाइन (अर्हता- ॲप्लाईड आर्ट, इंटेरिअर डिझाइन, ऑर्किटेक्चर,  पेंटिंग, स्क्लप्चर किंवा फाईन आर्टमधील पदवी. या अभ्यासक्रमाचा कालावधी-सहा सत्रात विभागलेली तीन वर्षे), (६) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन स्क्रीन ॲक्टींग‌ (अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार सत्रात विभागलेली दोन वर्षे), (७) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन स्क्रीन प्ले रायटिंग फॉर टीव्ही,  फिल्म व   वेबसिरीज (अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार सत्रात विभागलेली दोन वर्षे).

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन स्क्रीनप्ले रायटिंग फॉर टीव्ही,  फिल्म व   वेब सिरीज, वगळल्यास इतर सर्व अभ्यासक्रमांना  पदव्युत्तर पदवीचा दर्जा भारतीय विद्यापीठ संघाने (असोशीएशन ऑफ  इंडियन युनिर्व्हसिटीज )दिला आहे.

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जाँईट एंट्रन्स टेस्ट(जेईटी) घेतली जाते. या परीक्षेतील गुण, उमेदवारांनी दिलेला पर्याय व उपलब्ध जागा लक्षात घेऊन त्यांना पुणे येथील          ‍फिल्म ॲण्ड टेलिव्हीजन ‍ इंस्टीट्यूट  किंवा  कोलकता येथील सत्यजीत रे फिल्म ॲण्ड टेलिव्हीजन ‍ इंस्टीट्यूटमध्ये प्रवेश दिला जातो.

ॲनिमेशन ॲण्ड  व्हीज्युअल  इफेक्ट्स डिझाइन

 टीव्हीसाठी ॲनिमेशन ॲण्ड  व्हीज्युअल  इफेक्ट्स डिझाइन, हा  हा अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स चालवला जातो.  अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी .कालावधी- सहा सत्रांमध्ये  विभाजित केलेली तीन वर्षे.

हा अभ्यासक्रम सर्जनशीलता व  तंत्रज्ञान यांचा संगम साधणारा आहे. ॲनिमेशनच्या विविध संकल्पना, दृष्यांचा परिणाम याबाबींचे प्रगत ज्ञान प्रदान केले जाते. प्रात्यक्षीकांवार भर दिला जातो. ॲनिमेशन चित्रपट तंत्राच्या अनुषंगाने, स्टोरी बोर्डिंग (कथानकाची निर्मिती), ड्राईंग ( चित्रांकन), क्रिएटिंग  व्हीज्युएल्स( दृष्यांची ‍निर्मिती), डिझाइन प्रिंसिपल्स (अधीकल्पाची तत्वे),‍  कॅमेरा    टे‍क्नीक( कॅमेराची तंत्रे), विविध सॉफ्टवेअर यांचे  प्रशीक्षण दिले जाते.

विविध माध्यमांमध्ये काम करता येणे शक्य व्हावे व सतत नवे तंत्र हस्तगत करता यावे या अनुषगांने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.          कथानकाच्या अनुषंगाने  सुयोग्य सॉफ्टवेअरचा उपयोग कसा करायचा?हा महत्वाचा   भाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

प्रत्येक वर्षाच्या शेवटी व्यक्तीगत किंवा समुहामध्ये प्रकल्प दिला जातो. त्याव्दारे प्रत्यक्ष  ॲनिमेशन साकारता येते. तिसऱ्या वर्षाच्या शेवटी ॲनिमेशन  व  व्हीज्युएल तंत्रावर  आधारीत  चित्रपट तयार करण्याची संधी विध्यार्थ्यांना मिळते.

 

संपर्क-विधी महाविद्यालय मार्ग पुणे ४११००४, दूरध्वनी- ०२०-२५५८००११

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी