वेगळे पर्याय,वेगळया संधी
वेगळे
पर्याय,वेगळया संधी
वेगळ्या
ज्ञान शाखा निवडून त्यात करिअर करण्याची इच्छा बऱ्याच मुलांना असते. पालकांचाही त्यांना
पाठिंबा असतो. असे काही अभ्यासक्रम आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या शहरात असतात किंवा
इतर शहर किंवा इतर प्रांतात असतात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यावर, त्याचा झोकून
देऊन अभ्यास केला आणि अधिकाधिक ज्ञान ग्रहण केले तर करिअरला दिशा मिळू शकते. तशी आपली
मानसिक तयारी असायला हवी. नवं काहीतरी शिकण्याचा उत्साह काही दिवसात किंवा काही महिन्यात
कमी झाला तर मग पाट्या टाकण्याकडे कल झुकतो. अशा पाट्या टाकल्या की पदवी किंवा पदविका
प्रमाणपत्र मिळेलही पण करिअवर पाटा किंवा वरंवटा फिरवला जाण्याची शक्यता अधिक असते.
या बाबी लक्षात ठेऊनच नव्या आणि वेगळया अभ्यासक्रमांचा विचार करावा. असे काही अभ्यासक्रम
पुढील प्रमाणे आहेत.
(१) महाराष्ट्र अग्निशमन सेवा
अकादमी ही, राज्य शासनाने अग्निशमन क्षेत्रातील
प्रशिक्षित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी स्थापन केलेली महत्वाची संस्था. या संस्थेत
दहावी झालेल्या मुलांसाठी ,अग्निशामक प्रशिक्षण प्राठ्यक्रम, हा अभ्यासक्रम चालवला
जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. दहावीमध्ये खुल्या संवर्गातील
विद्यार्थ्यांनी ५० टक्के गुण आणि इतर राखीव संवंर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के
गुण मिळायला हवे. दहावीमध्ये मराठी विषय घेतलेला असावा आणि दहावी पहिल्याच प्रयत्नात
उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. वयोमर्यादा खुला संवर्ग १८ ते २३ वर्षे, अनुसूचित जाती आणि
जमाती संवर्गासाठी ५ वर्षे आणि इतर मागास वर्गासाठी ३ वर्षे वयोमर्यादेत सुट. या अभ्यासक्रमाची
प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. संपर्क -विद्या नगरी, हंस भुग्ना मार्ग, सांताक्रुज- पूर्व, मुंबई ४०००९८, संकेतस्थळ-https://mahafireservice.gov.in,
ईमेल-infor@ mahafireservice.gov.in
(२)
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रेमिला विठ्ठलदास पॉलिटेक्निक या
संस्थेत, डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅच्यर हा अभ्यासक्रम करता येतो. दागिण्यांचे
डिझाइन आणि त्याच्या निर्मिती प्रक्रियेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज भासते.
हा कौशल्य आधारित अभ्यासक्रम आहे. त्यामुळे विद्यार्थी जितके कौशल्य प्राप्त करतील
तितकी अधिक त्यांना रोजगाराची संधी मिळण्याची शक्यता राहू शकते. या अभ्यासक्रमात इंटर्नशीपचा
समावेश आहे. अभ्यासक्रम केल्यावर, फ्री लान्स डिझायनर, फॅक्ट्री मॅनेजर, बायर ,डिझायनर,
मार्केटिंग मॅनेजर, टेक्निकल सुपरवायझर, प्रोसेस स्पेशॅलिस्ट आदी रोजगार संधी मिळू
शकते. कालावधी-३ वर्षे.
संपर्क-सर
विठठलदास विद्या विहार, जुहू रोड, सांताक्रुज पश्चिम, मुंबई-४०००४९, संकेतस्थळ-www.pvsndt.ac.in
ईमेल-,pvp@sndt.ac.in
(३)
नर्सी मोन्जी युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येणाऱ्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ॲण्ड इंजिनीअरिंग या संस्थेत १० वीनंतरचा इंटिग्रेटेड
इंजिनीअरिंग अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा वर्षाचा
आहे. हा अभ्यासक्रम (१) मेकॅनिकल इंजिनीअरिंग, (२) कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, (३) डेटा
सायंस, (४) इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी या विषयांमध्ये करता येतो. विद्यार्थ्याला दहावीमध्ये
विज्ञान आणि गणितात सरासरीने ६५ टक्के गुण मिळायला हवेत. १२व्या सत्रामध्ये इंटर्नशीपची
सुविधा आहे.
संपर्क- https://engineering.nmims.edu/academics/programmes/integrated-b-tech/
ईमेल-AdmissionBTI@nmims.edu
००००
(४) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण
केंद्रामार्फत औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल रुम
येथे १० वी नंतरचे कौशल्य निर्मितीचे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत-(१)ॲडव्हान्स्ड
डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची
मान्यता मिळाली आहे. कालावधी- चार वर्षे.
(२) सर्टिफिकेट कोर्स इन मशिनिस्ट- कालावधी दोन वर्षे. (३) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स-कालावधी तीन
वर्षे. हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना
प्लेसमेंट साठी साहाय्य केले जाते.
या तिनही अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील
विद्यार्थ्यांना दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसुचित जाती आाणि
जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये १० टक्क्यांची सूट देण्यात येते. वयोमर्यादा
खुला संवर्ग-१५ ते १९ वर्षे. अनुसुचित जाती आाणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना ३ वर्षाची
सूट देण्यात येते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना शैक्षणिक शुल्कातून सूट
देण्यात येते.
दहावी मध्ये पास श्रेणीत उत्तीर्ण
झालेला विद्यार्थी या संस्थेतील सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटनंस ॲण्ड वेल्डिंग ऑपरेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन मशिन टूल
ॲण्ड वेल्डिंग ऑपरेशन या अभ्यासक्रमाला प्रवेश
मिळवू शकतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे.
(अ) छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने
(सारथी) इंडो जर्मन टूल रुम या संस्थेशी सहकार्याचा करार केला असून, त्यानुसार मराठा,
कुणबी,कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या संवर्गातील नॉन क्रिमिलेअर गटात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
१० वीनंतरचे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहे.
सर्व अभ्यासक्रम नि:शुल्क आहेत.
(१) सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निंग ॲण्ड मिलिंग, कालावधी-
१२ महिने. (२) सर्टिफिकेट कोर्स इन टूल ॲण्ड डायमेकिंग, कालावधी- १२ महिने. (३) सर्टिफिकेट
कोर्स इन सीएनसी (कॉम्प्युटर न्युमरिकल कंट्रोल) टर्निंग, कालावधी-६ महिने, (४) सर्टिफिकेट
कोर्स इन मिलिंग, कालावधी- ६ महिने. या सर्व
अभ्यासक्रमांना पास श्रेणीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.हे अभ्यासक्रम पूर्णवेळ
आणि अनिवासी स्वरुपाचे आहेत.
(ब) महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था(महाज्योती)
आणि इंडो जर्मन टूल संस्थेने इतर मागास वर्ग,विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त व भटक्या
जमाती संवर्गातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपरोक्त चारही अभ्यासक्रम नि:शुल्क
सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम पूर्णवेळ आणि निवासी स्वरुपाचे आहेत.
आयटीआय (टर्नर/ फिटर/ मशिनिस्ट/
ग्राईंडर/ टूल अँड डाय मेकर/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ वेल्डर) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-(१) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी मशिनिंग,
कालावधी-१ वर्षे, (२)ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटनन्स, कालावधी-१ वर्षे,
(३) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन वेल्डिंग टेक्नॉलॉजी, अर्हता-,कालावधी-१ वर्षे,
(४) सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी मशिनिंग, ,कालावधी-६ महिने.
संपर्क-इंडो जर्मन टूल रुम
,पी ३१, एमआयडीसी, चिखलठाणा इंडस्ट्रिअल एरिआ, औरंगाबाद- ४३१००६, संकेतस्थळ-www.igtr-aur.org,
ईमेल-info@igtr-aur.org
००००
००००००
(क) या संस्थेने पीएम दक्ष,
या योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि इतर मागास
वर्ग संवर्गासाठी पुढील अभ्यासक्रम नि:शुल्क सुरु केले आहेत- सर्टिफिकेट कोर्स इन मिलिंग -या अभ्यासक्रमाचा
कालावधी पाच महिने, सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निंग-या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच
महिने . पास श्रेणीतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रशिक्षणाच्या
कालावधीत विद्यावेतन दिले जाते. हा अनिवासी अभ्यासक्रम आहे.
(ड)नॅशनल एसस्सी आणि एसटी हब या संस्थेच्या सहकार्याने या
संस्थेने पुढील रोजा्गाभिमुख अभ्यासक्रम सुरु केले आहेत- (१) हँड हेल्ड प्रॉडक्टस-मोबाईल
रिपेरिंग, अर्हता-१२वी/ आयटीआय/ डिप्लोमा उत्तीर्ण, कालावधी-४६० तास, (२) ऑडिओ व्हिडिओ
प्रॉडक्टस-टिव्ही रिपेरिंग, अर्हता-१२वी/आयटीआय/डिप्लोमा उत्तीर्ण, कालावधी-४६० तास,
(३) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स,अर्हता-इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन,
मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पास श्रेणितील पदविका किंवा पदवी, कालावधी-
७८० तास, (३) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन ऑटोमेशन ॲण्ड प्रोसेस कंट्रोल, अर्हता-इलेक्ट्रिकल,
इंस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पास श्रेणितील पदविका
किंवा पदवी कालावधी- ७८० तास
(३) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाइन ॲण्ड ॲनॅलिसीस,
अर्हता-सिव्हिल इंजिनीअरिंग विषयातील पास श्रेणितील
पदविका किंवा पदवी कालावधी- ७८० तास. हा निवासी अभ्यासक्रम असून राहण्याची आणि भोजनाची
नि:शुल्क सोय केली जाते. प्लेमेंटसाठी साहाय्य केले जाते.
000
(५) सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत
येणाऱ्या इंस्टिट्यूट फॉर डिझाइन इलेक्ट्रिकल मेझरेमेंट्स इंस्ट्रुमेंटेशन या संस्थेने
पुढील कौशल्य निर्मिती आणि रोजगार स्वयंरोजगास प्राधान्य देणारे अभ्यासक्रम सुरु केले
आहेत.
(१)ॲनिमेशन ॲण्ड
मल्टिमीडिया टेक्नॉलॉजी- या अभ्यासक्रचा कालावधी सहा महिने आहे. दहावी उत्तीर्ण
विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो. (२) ॲडव्हान्सड वेब डिझायन ॲण्ड ॲनिमेटर- दहावी
उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रचा कालावधी सहा महिने.
(३) थ्री डी-ॲनिमेशन ॲण्ड स्पेशल इफेक्टस, - या अभ्यासक्रचा कालावधी सहा महिने
. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो.

Comments
Post a Comment