स्मार्ट व्यवस्थापक भाग दोन
स्मार्ट व्यवस्थापक भाग दोन
आयआयएम रांची
या संस्थेच्या इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन
मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एमबीए
पदवी प्रदान केली जाते. अर्हता - या अभ्यासक्रमाला
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६०
टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.
प्रवेश प्रकिया
या अभ्यासक्रमाला दोन पध्दतीने प्रवेश दिला
जातो.
(१) स्कॉलिस्टिक ॲडमिशन टेस्ट (एसएटी) - ही परीक्षा देशातील ७० केंद्रावर
दरवर्षी मार्च, मे, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर मध्ये कॉलेज बोर्डामार्फत घेतली
जाते. (संपर्क-collegereadiness.collegeboard.org/sat)
जगभरातील शैक्षणिक संस्थांमधील पदवी
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. या परीक्षेत
मिळालेले गुण थेट रांची आयआयएम कडे पाठवावयाचे असतात. (पाचही वेळा परीक्षा दिली असल्यास
सर्वोत्तम गुण आयआयएमला पाठवता येतात.) आयआयएम रांचीचा सॅट कोड हा ९१०९ हा आहे.
सॅट परीक्षेच्या शुल्कात कुटुंबाच्या
उत्पनानुसार सवलत मिळू शकते. जर विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८
लाखांपेक्षा कमी असेल तर या विद्यार्थ्यास
परीक्षा शुल्कात ९० टक्के सूट मिळते. जर पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा
जास्त आणि १५ लाखांपेक्षा कमी असल्यास ५० टक्के सूट दिली जाते.
सॅट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयआयएम
रांचीच्या आयपीएम (इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट) अभ्यासक्रमासाठी स्वतंत्रपणे अर्ज भरणे आवश्यक
आहे. कॉलेज बोर्ड संकेतस्थळाच्या सहाय्याने सॅटमधील गुण आयआयएमला मिळाल्यावरच अर्ज
प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जाते.
२०२१ चा सॅट कॅटऑफ पुढीलप्रमाणे - खुला संवर्ग-
१३५०, ओबीसी - १०५०, इडब्ल्यूएस-(इकॉनॉमिकली विकर सेक्शन) - १०३०, अनुसूचित जाती व जमाती संवर्ग- ९३०.
२) इंटिग्रेटेड प्रोग्रॅम मॅनेजमेंट
ॲप्टिट्यूड टेस्ट - ही परीक्षा आयआयएम मार्फत घेतली जाते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे रिटन
ॲबिलिटी टेस्ट (लेखी
क्षमता चाचणी) या
टप्प्यासाठी उमेदवारांची निवड करते. त्यानंतर मुलाखती घेतल्या जातात. या दोन्ही प्रकिया दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई, बेंगळुरु आणि रांची येथे पार पाडल्या
जातात.
हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्णपणे
निवासी स्वरुपाचा आहे. तीन वर्षानंतर एखाद्या विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमाच्या
बाहेर पडावयाचे असल्यास त्याला तशी सुविधा दिली जाते. या विद्यार्थ्याला बीबीए ही
पदवी प्रदान केली जाते. इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट फॉर सेंकडरी स्कूल (आयजीसीएसी) आणि इंटरनॅशनल बॅक्कालौरेट (आयबी) या बोर्डाचे विद्यार्थीही अभ्यासक्रमास प्रवेश
घेऊ शकतात.
काय शिकाल?-
पहिल्या तीन वर्षांमध्ये पुढील विषय शिकवले
जातात - बिझिनेस मॅथेमॅटिक्स, नॅचरल सायंस, कम्युनिकेशन स्किल (ओरल आणि रिटन), इंडियन लिटरीचर, आर्ट्स ॲप्रिशिएशन, सायकॉलॉजी, मॅनेजिंग स्ट्रेस, सोशिऑलॉजी, बेसिक वर्ड/एक्सेल, क्रिटिकल थिंकिंग ॲण्ड प्रॉब्लेम
सॉलव्हिंग, इंट्रॉडक्शन टू बिझिनेस, मायक्रोइकॉनॉमिक्स, इंडियन सोसायटी-व्हॅल्यूज ॲण्ड कल्चर,
इंट्रॉडक्शन टू प्रोग्रॅमिंग, क्रिएटिव्हिटी ॲण्ड इनोव्हेशन, बिझिनेस इथिक्स ॲण्ड कॉर्पोरेट सोशल
रिस्पाँसिबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, इन्फॉर्मेशिन सिस्टिम्स, फिलॉसॉफी, फायनांशिअल अकाउंटिंग, बिझिनेस लॉ, प्रिंसिपल्स ऑफ मॅनेजमेंट, ऑपरेशन रिसर्च, डेटा सायंस, फॉरेन लँग्वेज, मार्केटिंग मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट, रिसर्च मेथडॉलॉजी, इकॉनॉमेट्रिक्स, मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनांशिअल मॅनेजमेंट, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, आंत्रप्रिन्युरशीप, सेल्स/पर्सनल सेलिंग, बिझिनेस ॲनॅलिटिक्स, लेबर लॉ/ इंडस्ट्रिअल रिलेशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, इंडियन इकॉनॉमी. चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी नियमित
स्वरुपाच्या एमबीए अभ्यासक्रमाचेच विषय विद्यार्थ्यांना शिकवले जातात.
संपर्क- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मनेजमेंट, सूचना भवन, फिफ्थ फ्लोअर, ऑड्रे हाऊस
कॅम्पस, मेउर्स रोड रांची- ८३४००८, दूरध्वनी- ०६५१ २२८०११३, संकेतस्थळ- iimranch.ac.in
०००
आयआयएम रोहतक
२०१९ च्या शैक्षणिक वर्षापासून रोहतक स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केला आहे. पदवी ते पदव्युत्तर पदवी
असा या अभ्यासक्रमाचा व्यापक अवकाश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर
संस्थेमार्फत एमबीए ही पदवी प्रदान केली जाते. एखाद्या विद्यार्थ्यास तीन
वर्षानंतर हा अभ्यासक्रम सोडवासा वाटल्यास, बीबीए - बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही
पदवी प्रदान केली जाते. तथापि चौथ्या आणि पाचव्या वर्षाच्या प्रवेशासाठी
विद्यार्थ्यांना किमान सीजीपीए (कुमुलिटिव्ह ग्रेड पॉईंट
ॲव्हरेज) ५ मिळवावा लागतो. हा
अभ्यासक्रम १५ सत्रांमध्ये शिकवला जातो. प्रत्येक वर्षी तीन सत्रे घेण्यात येतात.
हा अभ्यासक्रम दोन भागात
विभाजित करण्यात आला आहे. पहिल्या भागात पायाभूत विषयांमध्ये लक्ष केंद्रित केले
जाते. दुसऱ्या भागात व्यवस्थापन विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. प्रत्येक
वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करावी लागते. १६० विद्यार्थ्यांना प्रवेश
दिला जातो.
अभ्यासक्रमाची संरचना- हा अभ्यासक्रम गणित,
अर्थशास्त्र, सांख्यिकी, गणित, मानव्यशास्त्र या चार घटकांमध्ये विभाजित करण्यात
आला आहे. कम्युनिकेशन मॅनेजमेंट- व्यवसाय संवाद संप्रेषण, इंफर्मेशन सिस्टिम -
माहिती कार्यप्रणाली आणि परदेशी भाषा यांचा अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात
आली. चौथ्या आणि पाचव्या वर्षात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी जे विषय शिकवले
जातात तेच विषय या अभ्यासक्रमात शिकवले जातात.
काय शिकाल?
पहिल्या
तीन वर्षी पुढील विषयांचा अभ्यास करावा लागतो.
(१) इकॉनॉमिक्स (२) फायनांस (३) अकाउंटिंग (४) लॉ,
(५) स्टॅटिस्टिक्स, (६) मॅथेमॅटिक्स (७) फिलासॉफी (८) सायकॉलॉजी (९) बिझिनेस कम्युनिकेशन (१०) पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन (११) सोशिऑलॉजी (१२) सस्टेनिबिलिटी (१३) प्रिंसिपल्स ऑफ मॅनेजमेंट (१४) मीडिया ॲण्ड जर्न्यालिझम
(१५) ॲडव्हर्टायजिंग (१५) बिझिनेस हिस्ट्री (१६) इंफर्मेशन टेक्नॉलॉजी.
चौथ्या
आणि पाचव्या वर्षात पुढील विषय शिकावे लागतात- (१) जनरल मॅनेजमेंट
(२) बिझिनेस कम्युनिकेशन
(३) मार्केटिंग
मॅनेजमेंट (४) स्ट्रॅटेजिक
मॅनेजमेंट (५) मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टिम
(६) ऑपरेशन मॅनेजमेंट ॲण्ड क्वाँटिटेटिव्ह टेक्निक (७) ह्युमन रिर्सोस मॅनेजमेंट ॲण्ड ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर
(८) इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी (९) फायनांस ॲण्ड अकाउंटिंग,
इतर विषय - (१) पब्लिक स्पिकिंग (२) क्रिएटिव्ह रायटिंग (३) रुरल ॲण्ड सोशल इर्मशन प्रोजेक्ट (४) बिझिनेस इंटर्नशीप
अर्हता- हा
अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास करता
येतो. अनुसूचित
जाती आणि जमाती संवर्गासाठी गुणांची मर्यादा 55 टक्के. २० जून २०२२ रोजी विद्यार्थ्याचे
किमान वय २० वर्षे असावे.
प्रवेश
प्रक्रिया
या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी, आयपीएम ॲप्टिट्यूड टेस्ट, द्यावी लागते.(या परीक्षेसाठी
नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख २ मे २०२२. ही परीक्षा २६ जून २०२२ रोजी घेतली
जाईल. महाराष्ट्रातील केंद्रे- मुंबई, नागपूर आणि पुणे) या परीक्षेत,
संख्यात्मक कौशल्य चाचणी, तार्किक विचार करण्याची क्षमता आणि कौशल्य चाचणी , इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व चाचणी
असे तीन विभाग असतात. प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी ४० प्रश्न विचारले जातील.
प्रत्येक भागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकी ४० मिनिटांचा कालावधी दिला जातो.
प्रत्येक अचुक उत्तराला ४ दिले जातात. चुकलेल्या उत्तरासाठी १ गुण कापला जातो. या चाळणी परीक्षेत विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण निवडक विद्यार्थ्यांना
जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, सामान्य ज्ञान आणि संवाद कौशल्य याची चाचपणी
केली जाते.
अंतिम गुणवत्ता
यादी तयार करताना कल चाचणी परीक्षेतील गुणांना ४५ टक्के वेटेज,
मुलाखतीतील गुणांना १३ टक्के वेटेज, आणि शैक्षणिक कामगिरीला ४0 टक्के वेटेज
दिले जाते.
संपर्क- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रोहतक मॅनेजमेंट सिटी, सदर्न बायपास, एनएच - 10, सुनारिआ रोहतक -124010, दूरध्वनी- 01262 - 2285४० , संकेतस्थळ- www.iimrohtak.ac.in,ईमेल- ipmoffice@iimrohtak.ac.in
000
आयआयटी -रुरकी
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकीने, बीटेक इन
प्रोसेस इंजिनीअरिंग ॲण्ड एमबीए हा पाच वर्षे कालावधीचा ड्युएल डिग्री अभ्यासक्रम
सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाला जेईई ( ॲडव्हान्स्ड) या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो.
संपर्क-आयआयटी, शहारणपूर कॅम्पस शहारणपूर (रुरकी) - २४७००१,दूरध्वनी- ०९१-१३२-२७१४३०३, संकेतस्थळ- ppe.iitr.ac.in
००००

Comments
Post a Comment