डेटा सायन्स किंवा विदा विज्ञान
डेटा
सायन्स किंवा विदा विज्ञान
करोनोत्तर काळात एक किंवा दोन वा अधिक कौशल्य प्राप्त केलेल्या
उमेदवारांना अधिकाधिक संधी देण्याकडे कंपन्या/उद्योग/स्टार्ट अप/कॉर्पोरेट यांचा
कल दिसून आला. यापुढेही हाच कल कायम राहील. त्यामुळे अशा कौशल्यांना हस्तगत करणे
आणि त्याचे सतत उन्नतीकरण (अपग्रेडेशन) करणे ही बाब,
यापुढील काळात अत्यंत महत्वाची ठरेल. पालक-शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हे वास्तव
पक्कं लक्षात ठेवायला हवे.
(१) डेटा सायन्स किंवा विदा विज्ञान-
हे क्षेत्र सध्या सर्वाधिक
चर्चेचे आणि मागणी असलेले आहे. करोना काळात
विविध बाबींचा डेटा (विदा/ माहिती)च्या वापराची गती
विस्मयकारक ठरली. ही वाढ ३८ ते ४० टक्के इतकी आहे. त्यामुळे डेटा सुरक्षेची
नवी संसाधने आणि तंत्रासह डेटाशी संबंधित विविध प्रकारचे करिअर पुढील काळात
निर्माण होतील.
डेटा सायन्सचा अभ्यासक्रम
करणाऱ्या उमेदवारांना डेटा ॲनॅलिस्ट, डेटा इंजिनीअर्स, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर,
मशिन लर्निंग इंजिनीअर, डेटा सायंटिस्ट, डेटा आर्किटेक्ट, स्टॅटिस्टिअन, बिझिनेस
ॲनॅलिस्ट, डेटा ॲण्ड ॲनॅलिटिक्स मॅनेजर अशा भूमिकांसाठी नोकरी अथवा रोजगाराची संधी
मिळू शकते.
याक्षेत्रातील उमेदवारांना
अधिकाधिक प्रभावीरीत्या आणि सर्जनशीलपणे कार्यकरुन कंपनी/उद्योगाच्या
उत्पादनक्षमतेत वृध्दी करण्याची जबाबदारी पार पाडावी लागते.
करोनोत्तर काळात ओव्हर द टॉप
प्लॅटफॉर्म्स (ओटीटी) ते स्मार्ट गॅजेट्स (उपकरणे/संयंत्रे) यांच्या प्रभावाचा मुख्य आधार डेटा ठरत आहे. डेटाचा वापर आणि
ग्राहकाची वर्तणूक यांचा अनोन्य संबंध प्रस्थापित झाल्याचे दिसते. त्यामुळे डेटा
विश्लेषक आणि त्या निष्कर्षानुसार व्युहनीती ठरवणारे मार्केटर्स या तज्ज्ञांची गरज
वाढलीय. सांख्यिकी तंत्रावर हुकूमत असणाऱ्या किंवा मिळवणाऱ्या डेटा सायंटिस्ट
किंवा विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळया संधी चालून येऊ शकतात.
सध्या मशिन लर्निंग,
स्टॅटिस्टिक्स, रिसर्च, प्रेडिक्शन, व्हिज्युअलायझेशन, रिकंमडेशन, ऑप्टिमायझेशन,
नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ॲण्ड रिग्रेशन, डीप लर्निंग या क्षेत्रातील कौशल्ययुक्त
मनुष्यबळाची वाणवा भासायला लागलीय. एका सर्वेक्षणानुसार सध्या ६५ ते ७० टक्के नोकऱ्यांसाठी,
मशिन लर्निंगचे या विषयाचे ज्ञान अत्यावश्यक समजले जाते.
डेटा
सायंटिस्टला गूगल ॲनॅलिटिक्स, गूगल सर्च कन्सोल सारख्या तंत्रामध्ये पारंगतता असणे
आवश्यक ठरु शकते. ४५ ते ४८ टक्क्यांच्या आसपास नवे रोजगार या तंत्र कौशल्याशी
निगडित आहेत. एचटीएमल-हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि सीएसएस(कॅसकॅडिंग स्टाइल शीट्स), या तंत्रात अवगत असणारे उमेदवार इतरांपेक्षा दोन
पावलं समोर राहू शकतात.
की-वर्ड
रिसर्च हे असेच एक क्षेत्र आहे. गेल्या वर्षी २५ ते ३० टक्के रोजगारासाठी आवश्यक बाबींपैकी हे
महत्वाचे तंत्रकौशल्य अपेक्षिले गेले. मोबाइल सर्च इंजिन ऑप्टमायझेशनचे (एसइओ) तंत्र कौशल्य हस्तगत केलेल्या उमेदवारांना अधिक चांगल्या संधी मिळू
लागल्या आहेत. डेस्क टॉपपेक्षा मोबाइलवर अधिकाधिक शोध घेण्याची आणि काम करण्याची
गती वाढल्याने या क्षेत्रातील कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरजही वाढत चाचलीय. एका
सर्वेक्षणानुसार सर्च इंजिन ऑप्टमायझेशन तज्ज्ञांसाठी, पुढील टक्केवारीत,
कौशल्याची गरज गेल्यावर्षी भारतात नोंदवली गेली. गुगल टूल-५२ टक्के, लिंक
बिल्डिंग-४२ टक्के, की-वर्ड रिसर्च--३७ टक्के, ऑन पेज एसइओ-
-३४ टक्के, एचटीएमएल आणि
सीएसस--२८ टक्के, टेक्निकल सीइओ-- १६
टक्के, लोकल सीइओ--१४
टक्के, मोबाइल सीइओ-- ८
टक्के.
(२) क्लाऊड कॉम्प्युटिंग-
यापुढील काळात प्रत्येक कंपनीचा
मुलभूत पाया क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारलेला असेल. हे तंत्रज्ञान आर्थिकदृष्ट्या परवडणारे
असून करोनोत्तर काळात या तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे अधिकाधिक
कंपन्या/कॉर्पोरेट्स/उद्योग वळण्याची शक्यता आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग तंत्रामुळेच
घरातून काम, ही कार्यशैली किंवा कार्यप्रणाली यशस्वी होऊ शकली.
गुगल,
मायक्रोसाफ्ट या कंपन्या सातत्याने स्वत:च्या क्लॉऊड कॉम्प्युटिंग नेटवर्कमध्ये
सुधारणा करत आहेत. किंबहुना या कंपन्यांनी यावर आपले लक्ष ठळकपणे केंद्रित केले
आहे. यापुढील काळात हे तंत्रज्ञान ऑपरेशन्स (कार्यान्वयन), मार्केटिंग (विपणन), विक्री (सेल) या क्षेत्रातही वापरले जाईल.
जनरल क्लाऊड कॉम्प्युटिंग मधील कौशल्ययुक्त
मनुष्यबळाला ॲमेझॉन वेब सर्व्हिस, मायक्रोसॉफ्ट अझुरे, गुगल क्लाऊड प्लॅटफॉर्म या
ठिकाणी अग्रक्रमाने संधी मिळाली. ॲमेझॉन
वायरलेस सर्व्हिस या संस्थेकडे ग्राहकांचा अधिक ओढा दिसून येतो कारण इतर अनेक
कंपन्या या संस्थेच्या सेवा मॉड्युलचा उपयोग , त्यांच्या सेवा देण्यासाठी करत
असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षात ॲमेझॉन वायरलेस सर्व्हिसच्या रोजगार
संधीत पाच पटिने वाढ झाली. डेटा हातळण्यासंदर्भात या बाबी असल्याने पुढील दहा
वर्षे या भूमिका आणि या तंत्रकौशल्याचे महत्व कायम राहणार असल्याचे या क्षेत्रातील
तज्ज्ञांचे सांगणे आहे. त्यामुळे करिअरची दिशा ठरवताना ही बाब पालक आणि
विद्यार्थ्यांनी यंदा ध्यानात घ्यायला हवी.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment